पुण्यामध्ये काल नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

पुण्यामध्ये काल नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. काल नव्याने नोंद झालेल्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

The number of discharged patients is higher than the number of new patients in Pune yesterday

शहरात नव्याने २१२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या १२,६८६ झाली आहे. तर कालच्या दिवसभरात २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुण्यातल्या विविध रूग्णालयात ४,४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे शहरातील एकूण तपासणी आता ९०,४०६ झाली असून काल ३,२२७ स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 21 जणांता अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.दरम्यान, पुण्यात 280 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 55 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यात सुरूवातीचे काही दिवस कंटेनमेंट झोनमध्ये अधिक रूग्णसंख्या मिळत होती. मात्र अनलॉकिंगला जेव्हापासून सुरूवात झाली आहे तेव्हापासून नागरिकांची पुण्याच्या इतर ठिकाणी ये जा सुरू झाल्याने आता ग्रीन झोनमध्येही रूग्णसंख्या मिळू लागली आहे त्यामुळे साहजिकच पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment