केंद्र सरकारने जनधन खात्यामध्ये पैसे जमा केले ; रक्कम काढण्यासाठी हे आहेत नियम - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ५ जून, २०२०

केंद्र सरकारने जनधन खात्यामध्ये पैसे जमा केले ; रक्कम काढण्यासाठी हे आहेत नियम


टीम मंगळवेढा टाईम्स । केंद्र सरकारने जनधन खात्यामध्ये जून महिन्यासाठीचे पैसे जमा केले आहेत. महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारने ५०० रुपये ट्रान्सफर केले आहेत. हे पैसे काढण्यासाठी सरकारने दिवसही निश्चित केला आहे. नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी करू नये, तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं, म्हणून हा नियम करण्यात आला होता.

हेही वाचा 

दिलासादायक : सोलापुरमध्ये पहिल्यांदाच आजचे सर्व रिपोर्ट आले निगेटिव्ह 

जागतिक पर्यावरण दिन : सुरूवात कशी झाली? का साजरा केला जातो पर्यावरण दिन? जाणून घ्या 


जनधन खात्यातले पैसे काढण्यासाठीचा दिवस निश्चित करण्याचा नियम मे महिन्यापासून लागू झाला. या नियमानुसार ५ दिवस बँकेमधून ही रक्कम काढता येणार आहे. जनधन खात्याच्या शेवटच्या अंकानुसार पैसे काढण्याचा दिवस ठरवून देण्यात आला आहे.

शेवटची संख्या ० किंवा १ असेल त्यांच्यासाठी ५ जून

शेवटची संख्या २ आणि ३ असेल त्यांच्यासाठी ६ जून

शेवटची संख्या ४ आणि ५ असेल त्यांच्यासाठी ८ जून

शेवटची संख्या ६ आणि ७ असेल त्यांच्यासाठी ९ जून

शेवटची संख्या ८ आणि ९ असेल त्यांच्यासाठी १० जून

सरकारने आत्तापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून २०.६३ कोटी महिलांना जनधन खात्याच्या माध्यमातून दोन हफ्त्यांमध्ये २०,३४४ कोटी रुपये दिले आहेत. जूनमधली ही रक्कम तिसरी आहे. जनधन खात्यातले पैसे काढण्यासाठी बँकेत जायचं असेल तर बँकेत जाण्याचा किंवा बँक मित्र या माध्यमातून पैसे घरी पाठवण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे, असं अर्थ खात्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

बँकांकडून जनधनचे पैसे काढण्यासाठी नियम कडक करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी हे नियम करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात सरकारने खात्यात पैसे टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांची बँकेत गर्दी झाली होती. त्यामुळे खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकावरून पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

खातेदारक बँक मित्र किंवा सर्व्हिस सेंटरमधूनही पैसे काढू शकतात, असं इंडियन बँक असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे. तसंच एटीएममधूनही पैसे काढण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही, पण ११ मेनंतर कोणताही खाते क्रमांक असलेला व्यक्ती हे पैसे काढू शकतो.

नागरिकांनी बँकेबाहेर गर्दी करू नये, असं आवाहनही इंडियन बँक असोसिएशनकडून करण्यात आलं आहे. खाते क्रमांकाच्या शेवटच्या संख्येप्रमाणेच पैसे देण्यात येणार आहेत, असंही असोसिएशनने सांगितलं आहे.

These are the rules for depositing and withdrawing money from the government in Jandhan's account

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा