मोठी बातमी ! अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

मोठी बातमी ! अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्यातील व्यावसायिक (professional)  आणि बिगर व्यावसायिक (non-professional) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी सध्या राज्यातील परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरवलेल्या  निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील  बिगर व्यावसायिक (non-professional)  अभ्यासक्रमांच्या यादीत बीए, बीकॉम आणि बीएससी यांचा समावेश आहे. तर कायदा, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम, स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर), फार्मसी हे अभ्यासक्रम व्यावसायिक (professional)  यादीत मोडतात. 

कोरोना संकट काळात राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक/बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या  Last year / last semester exams canceled शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे.


विद्यापीठांनी ठरवलेल्या सुत्रानुसार शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.


या विद्यार्थ्यांना विद्यापीठानं ठरवलेल्या सुत्रानुसार पदवी देण्यात येईल. यासाठी मोदींनी संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असं आवाहन ठाकरे सरकारकडून करण्यात आलं आहे.यासंदर्भात या अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय शिखर संस्थांना सूचना देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे. यामध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल कौन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशन या संस्थांचा समावेश आहे.राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर या संस्थांनी शिक्कामोर्तब करावं आणि तसे आपल्या अखत्यारीतील विद्यापीठांना कळवावं, अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानाना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment