Solar Eclipse: भर दिवसा होईल अंधार ! 25 वर्षानंतर सूर्यग्रहणामुळे असे दिसेल दृश्य - Mangalwedha Times

Breaking

Sunday, June 21, 2020

Solar Eclipse: भर दिवसा होईल अंधार ! 25 वर्षानंतर सूर्यग्रहणामुळे असे दिसेल दृश्य


मंगळवेढा टाईम्स टीम । आजचा रविवार सूर्यग्रहण असल्यामुळे खूप खास आहे. तब्बल 25 वर्षानंतर हे सूर्यग्रहण दिसणार आहे. ज्यामध्ये भर दिवसा रात्रीच्या अंधारासारखा काळोख होईल. हिमाचल प्रदेशामध्ये 25 वर्षानंतर बहुतेक भागात सूर्यग्रहण दिसण्याचा योगायोग आहे. हे ग्रहण सकाळी 10.23 मिनिटांनी सुरू होईल, जे दुपारी 1.48 मिनिटांनी संपेल. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास 95 टक्के सूर्यग्रहण असेल. तर दुपारी 12 च्या सुमारास ग्रहणामुळे रात्रीसारखा अंधार काही भागात पाहायला मिळेल. Solar Eclipse: It will be dark all day long!  This is what a solar eclipse will look like 25 years later

मिळालेल्या माहितीनुसार, हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नका असं आवाहन हिमाचल प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. तर 25 वर्षांनंतर आलेली ही खगोलीय घटना पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, खंडग्रास आणि कंकणाकृती अशा दोन अवस्थांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. मुंबईत हे सूर्यग्रहण सकाळी 10 वाजून 1 मिनिटांपासून सुरू होणार आहे.

खरंतर, ग्रहण पाहण्याची उत्सुकता जितकी सर्वांना आहे, तितकीच आता या ग्रहणामुळे कोरोनाचा नाश होईल अशी आशा अनेकांना आहे. कारण सूर्यग्रहणामुळे कोरोना बरा होऊ शकतो, असा दावा चेन्नईतील एका शास्त्रज्ञाने केला आहे. त्यामुळे सूर्यग्रहण पाहण्यापेक्षा कोरोनाचा नाश होईल या अपेक्षेने आता भारतीय त्या क्षणाची वाट पाहत आहेत.

सूर्यग्रहणामुळं कोरोना बरा होऊ शकतो असा दावा चेन्नईचे अणु आणि पृथ्वी वैज्ञानिक (Nuclear and Earth Scientist) केएल सुंदर कृष्णा यांनी केला आहे. केएल सुंदर यांच्या मते कोव्हिड-19 हा रोग गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या एका सूर्यग्रहणाशी (solar eclipse) संबंधित आहे. त्यामुळं डॉ. सुंदर कृष्णा यांचे म्हणणे आहे की, 26 डिसेंबरच्या या ग्रहणानं सूर्यमालेत ग्रहांची संरचना बदलली.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, सुंदर कृष्णा असेही म्हणाले की, 'हा बदल चीनमध्ये प्रथम पाहिला गेला. हा बदल एखाद्या प्रयोगामुळे किंवा हेतूपुरस्सर प्रयत्नांचा परिणाम आहे. त्यामुळं असा विश्वास आहे की, येत्या सूर्यग्रहण एक टर्निंग पॉइंट असल्याचं सिद्ध होऊ शकतो. कृष्णा यांनी दावा केला आहे की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे लोकांना यावर घाबरून जाण्याची गरज नाही. सूर्यप्रकाश आणि सूर्यग्रहण या प्राणघातक विषाणूचा एक नैसर्गिक उपचार म्हणून सिद्ध होईल.

सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते.

एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं पाहता येतात. त्यातलं एखाद-दुसरंच खग्रास ग्रहण असतं, तेदेखील सगळ्याच देशांतून दिसत नाही. कंकणाकृती ग्रहण दिसणं त्यापेक्षाही दुर्मिळ. चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच कंकणाकृती ग्रहण दिसतं. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं.

No comments:

Post a Comment