CoronaVirus : आरोग्य सेतुची टक्कर जगभरातील अँपस सोबत - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ८ जून, २०२०

CoronaVirus : आरोग्य सेतुची टक्कर जगभरातील अँपस सोबत


स्वप्नील फुगारे । देशभरात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याबाबत माहिती देणारं आरोग्य सेतु ऍप (Arogya Setu App) मे महिन्यात जगातील टॉप 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या ऍपपैकी एक बनलं आहे. कोरोना व्हायरसला ट्रॅक करणाऱ्या या सरकारी ऍपमुळे देशात वाढत्या कोरोना संसर्गामध्ये आरोग्य सेतु ऍपवरील लोकांचा विश्वास वाढताना दिसतोय.


नीति आयोगचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी याबाबत माहिती दिली. अमिताभ कांत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ‘आरोग्य सेतु ऍप लॉन्च करण्यात आल्यानंतर मे महिन्यात, सलग दुसऱ्या महिन्यात प्रमुख 10 डाऊनलोड करण्यात आलेल्या मोबाईल ऍपपैकी एक ठरलं आहे. भारतात कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी भारताने तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करुन जगात नेतृत्व केलं.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी देशाला संभोधित करताना लोकांना हे आरोग्य सेतु ऍप डाऊनलोड करण्याचं आवाहन केलं होतं.


कसा कराल आरोग्य सेतु ऍपचा वापर – प्ले स्टोरवरुन ऍप डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावं लागेल. पहिल्यांदा ऍप ओपन केल्यानंतर काही परवानग्या द्याव्या लागतील. आरोग्य सेतु ऍप ब्लूटूथ आणि जी.पी.एस.द्वारे काम करतं. हे ऍफ यूजरच्या मोबाईल क्रमांक, ब्लूट्यूथ आणि लोकेशन डेटाच्या मदतीने तुम्ही सुरक्षित आहात की, कोरोना संसर्गाचा धोका आहे याबाबत माहिती देतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा