बाप रे ! पंढरपूरमधील 'त्या' कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात 145 जण - Mangalwedha Times

Breaking

Sunday, June 28, 2020

बाप रे ! पंढरपूरमधील 'त्या' कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात 145 जण


मंगळवेढा टाईम्स टीम । पंढरपूर शहरात सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत एकूण 145 लोक त्यांच्या संपर्कात आलेले आहेत.  Pandharpur corona updated


त्यामध्ये शाळा, बँक आणि इतर ठिकाणी सम्पर्क आलेल्या लोकांचा समावेश आहे.
सदरची व्यक्ती एका सहकारी बँकेत संचालक असून 24 जून रोजी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ही व्यक्ती सहभागी होती. त्यामुळे बँकेतील 12 लोक जास्त जोखमीचे तर 13 लोक कमी जोखमीचे यानुसार संपर्कात आलेले आहेत.

सदरची व्यक्ती ज्या शाळेत शिक्षक आहे त्या शाळेत जास्त जोखमीचे 51 कमी जोखमीचे 94 एकूण 145 लोक जास्त जोखीम असलेले 14 तर कमी जोखीम असलेले बँक 66 लोक संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी कमी जोखिम असलेले आहेत अशी माहिती समजते. शाळेत एकूण 80 जणांच्या संपर्कात ही व्यक्ती आलेली होती. त्याशिवाय इतरही ठिकाणी संपर्कात आलेल्या लोकांची संख्या जास्त जोखीम 15 तर कमी जोखीम 25 या प्रमाणे आहेत. आणखी संपर्कात आलेल्या लोकांची माहिती काढण्यात येत आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

पंढरीत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या खालील प्रमाणे आहे
बँक – जास्त जोखमीचे 12, कमी जोखमीचे 13 एकूण 25,
शाळा – जास्त जोखमीचे 14, कमी जोखमीचे 66 असे एकूण 80
तर गर्दीच्या आणि इतर ठिकाणी सम्पर्क झालेल्यामध्ये जास्त जोखमीचे 25 तर कमी जोखमीचे 15 असे एकूण 40 लोक आहेत.

आणखी ट्रेसिंग सुरू असून अशा प्रकारच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन केले जाणार

शहरातील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तींचे swab तपासणीसाठी घेतले जाणार आहेत, त्याच बरोबर कमी जोखमीच्या लोकांना होम क्वारंटाईन तर अति जोखमीच्या लोकांना संस्था क्वारंटाईन केले जाणार आहे. या लोकांना पंढरपूर शहरातच क्वारंटाईन केले जाण्याची शक्यता आहे.

कोणामुळे झाली बाधा ?

गेली तीन महिने पंढरपूरच्या स्थानिक रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली नव्हती. ये रुग्ण सापडले ते पुणे , मुंबई आणि जपान वरुन आलेले होते. एकाही स्थानिकाला ही बाधा झाली नव्हती. आज सापडलेला रुग्ण हा स्थानिक आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून त्यांनी फक्त मंगळवेढ्यालाच एका विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. त्याशिवाय त्यांनी कुठेच प्रवास केला नाही. त्यामुळे या रुग्णास कोणामुळे बाधा झाली हा सवाल आता उपस्थित केला जातोय. प्रशासनासमोर आता याचे मूळ शोधण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment