शस्त्रक्रिया करताना महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार : पालकमंत्री दत्तात्रय भरणे - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

शस्त्रक्रिया करताना महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार : पालकमंत्री दत्तात्रय भरणेमंगळवेढा टाईम्स टीम । गर्भपातासह मूल बंद होण्याची शस्त्रक्रिया करीत असताना डॉक्टरांच्या मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील अश्‍विनी धनाजी इटकर या महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईचा इशारा Guardian Minister Dattatraya Bharane पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील अश्‍विनी धनाजी इटकर या महिलेचा गर्भपातासह मूल बंद होण्याची शस्त्रक्रिया करीत असताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा दि.19 जून रोजी मृत्यू झाला आहे.

मयत अश्‍विनी धनाजी इटकर ही महिला गर्भपातासह मुल बंद होण्याची शस्त्रक्रिया करण्याकरीता मंगळवेढा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.दुपारी 2.45 वा. शस्त्रक्रिया गृहात सदर महिलेला घेवून भूल दिल्यानंतर गर्भपात झाले. नंतर मुल बंद होण्याचे ऑपरेशन करण्यापुर्वी ती गंभीर झाली.या दरम्यान आवश्यक ते उपचार त्वरीत करण्यात आले. सर्व प्रयत्न करूनही अखेर सदर महिलेचा मृत्यू झाला.याप्रकरणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घातले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेने सर्वत्र महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.निष्काळजीपणा दाखविणार्‍या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी महिला वर्गातून पुढे येत आहे. दरम्यान,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी या महिलेचा व्हिसेरा राखून ठेवला असून अधिक तपासणीसाठी सोलापूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असल्याचे ग्रामीण रुग्णालय सुत्रांकडून सांगण्यात आले.

निष्काळजीपणा दाखविणार्‍या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी महिला वर्गातून पुढे येत आहे.योग्य कारवाई झाली तरच त्या मृत महिलेच्या आत्म्याला न्याय मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया महिला वर्गातून व्यक्त होत आहेत.

-----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment