राष्ट्रवादीला धक्का ; या मोठ्या नेत्याने दिला मतभेदांना कंटाळून राजीनामा - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

राष्ट्रवादीला धक्का ; या मोठ्या नेत्याने दिला मतभेदांना कंटाळून राजीनामा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला Senior NCP leader Shankar Singh Waghela यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल  Party president Sharad Pawar and leader Praful Patel  यांनी पत्र लिहून त्यांनी आपला निर्णय कळवला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या वाघेलांची मातब्बर नेते अशी ओळख आहे. त्यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. Push the NCP;  This big leader resigned because he was fed up with differences

पक्षांतर्गत मतभेदांना कंटाळून त्यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती आहे. गुजरात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी जयंत पटेल उर्फ बोस्की Jayant Patel alias Boski as the President of Gujarat NCP यांची नियुक्ती केल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. पक्षात आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नसल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते.शरद पवार यांनी गांधीनगरमध्ये जाऊन वाघेलांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता. आपल्या पक्षप्रवेशासाठी पवार गांधीनगरला आले होते याबद्दलही त्यांनी पवारांचे आभार मानले.

आपल्या कार्यकाळात झालेल्या निर्णयांमुळे तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे आणि हेच आपल्या राजीनाम्याचं मुख्य कारण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. गुजरातचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले वाघेला हे कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू होते.

आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पाच पक्षांमध्ये काम केलं आहे.भाजपमध्ये राजीनामा देऊन त्यांनी स्वत:चा पक्ष काढला होता. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र कुठल्याच पक्षात ते फार काळ रमले नाहीत. 1996-97 या काळात ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.

No comments:

Post a Comment