सोलापुरातील लॉकडाऊनचा प्रस्ताव मागे घ्या : नरसय्या आडम - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

सोलापुरातील लॉकडाऊनचा प्रस्ताव मागे घ्या : नरसय्या आडम

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव मागे घ्या , अन्यथा लॉकडाऊन झाल्यास लॉकडाऊन मोडणार , असा इशारा Former MLA Narasaya Adam माजी आ.नरसय्या आडम यांनी दिला आहे. Withdraw the lockdown proposal in Solapur: Narasaya Adam

अनलॉक १ सुरू केल्यानंतर लोकांना आपला रोजगार जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा मिळवण्यासाठी जी बंधने होती ती काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागण्याआधी प्रशासनाचे अपयश लपवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात १५ दिवस कडक संचारबंदी ची शिफारस केली आहे.

या कडक संचारबंदीमुळे कोरोना आटोक्यात येईल की नाही याची शाश्वती नाही.परंतु लोकांची पुन्हा उपासमार होईल. जर पुन्हा लॉकडाऊन झाल्यास लॉकडाऊन मोडणार अशी इशारा आडम यांनी दिला.

लॉकडाऊनचा प्रस्ताव मागे घेण्याबाबतमुख्यमंत्री, पालकमंत्री , जिल्हाधिकारी व आयुक्तांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ईमेलद्वारे निवेदन पाठविले आहे.On behalf of the Marxist Communist Party

No comments:

Post a Comment