खळबळजनक : भारतीय क्रिकेट संघातील 'या' गोलंदाजाच्या पत्नीने शेअर केला न्यूड फोटो - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

खळबळजनक : भारतीय क्रिकेट संघातील 'या' गोलंदाजाच्या पत्नीने शेअर केला न्यूड फोटो


टीम मंगळवेढा टाईम्स । भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद तर आता जगजाहीर आहे. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगपासून ते घरगुती हिंसाचारापर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत. कोलकातामधील एका न्यायालयाने तर मोहम्मद शमीवर खटलाही दाखल केला आहे. मोहम्मद शमीपासून वेगळं झाल्यानंतर हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. लॉकडाउनदरम्यान हसीन जहाँ आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअऱ करत आहे. मात्र शनिवारी हसीन जहाँने न्यूड फोटो शेअर करत खळबळ माजवली आहे.

हा फोटो शेअर करताना हसीन जहाँ पुन्हा एकदा मोहम्मद शमीवर निशाणा साधला आहे. "काल तू काहीच नव्हतास तेव्हा मी शुद्ध होती.


आज तू काहीतरी झाला आहेस त मी अशुद्ध झाली. असत्याचा पडदा टाकून सत्य लपवलं जाऊ शकत नाही. मगरीचे अश्रू काही दिवसांसाठीच सोबत देतात," असं हसीन जहाँने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हसीन जहाँने फोटोतील व्यक्ती मोहम्मद शमी असल्याचाही उल्लेख केला आहे. मोहम्मद शमीसोबत वाद सुरु असतानाही अशा पद्धतीने आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने हसीन जहाँला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

हसीन जहाँने २०१८ मध्ये मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. मोहम्मद शमीचे इतर महिलांसोबत संबंध असून मॅच फिक्सिंगमध्येही सहभागी असल्याचा दावा हसीन जहाँने केला होता. मोहम्मद शमीने मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. आपल्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला असून अनेकदा आपल्या मनात आत्महत्येचा विचार आल्याचं मोहम्मद शमीने सांगितलं होतं. पण आपल्या कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्यामुळे यामधून बाहेर पडू शकलो असंही त्याने सांगितलं होतं.

Wife Haseen Jahan shared a nude photo with Mohammad Shami, a sensation on social media

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा