सोलापुरात मास्कसह इतर नियमांचे उल्लंघन ; २४ जणांवर गुन्हे - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

सोलापुरात मास्कसह इतर नियमांचे उल्लंघन ; २४ जणांवर गुन्हे


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर येथे मास्क लावला नाही, रस्त्यावर वाढदिवस साजरा केला, विनाकारण फिरणे, दुचाकीवर डबलशीट फिरणे, नियमबाह्य दुकान चालू ठेवणे, पत्त्याचा जुगार खेळणे, कोरोनासाठी शासकीय सव्र्हे करताना मारहाण , अवैध गुटखा वाहतूक अशा कारणावरून २४ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई झाली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिस कारवाई होते.

पोलिस आयुक्तालयातर्फे एकूण २४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 

ठाणेनिहाय कारवाई : फौजदार चावडी ०३ , जेलरोड ०४ , सदर बझार ०६ , विजापूर नाका ० ९ , सलगर वस्ती ०२ , एमआयडीसी ६ , जोडभावी पेठ ०३ , एकूण २४

Violation of rules including masks in Solapur, crime against 24 persons

No comments:

Post a Comment