जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 30, 2020

जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । जुलै अखेर पर्यंत राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे बदल्या तर शाळा सप्टेंबर मध्ये सुरू केले जाणार आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे आतंरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी नेमलेल्या बदली समितीला नव्याने संगणकीय सॉफ्टवेअर बनविण्यास सूचना दिली असल्याची माहिती। Rural Development Minister Hassan Mushrif  ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला सांगितले. Delegation of Maharashtra State Primary Teachers Association  Transfers of teachers in the state by the end of July

ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी राजाराम वरूटे नामदेव रेपे , राजमोहन पाटील बाजीराव कांबळे , जी एस पाटील तुकाराम राजगुडे , एच.एन.पाटील , सखाराम राजगुडे रावण आदीनी चर्चा केली.

राज्यातील कोरोना रोगाचे प्रदुर्भाव कमी होई पर्यंत शाळा चालू करणार नाही कोणी काही परिपत्रक काढले तरी ग्रामीण विकास विभागाने बालकांच्या जिवाशी खेळनार नाही दोन तीन दिवसात स्पष्ट परिपत्रक काढण्यात येईल. बदल्या संदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग कोरोना आपत्कालीन काळात कर्मचार्याचे बदल्या आणि बढती एक वर्ष करणार नाही असे निर्णय घेतला असले तरी शासनाला आर्थिक बोजा पडणार नाही या अटीवर शिक्षकांच्या बदल्या बाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

साधारणता जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे आतंरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी नेमलेल्या बदली समितीला सॉफ्टवेअर तयार करण्यास सूचना दिली आहे. ग्रामीण विकास मंत्र्यांच्या या निर्णयामुळे शिक्षक समाधानी आहेत ,अशी माहिती शिवानंद भरले यांनी दिली.

No comments:

Post a Comment