जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या जैदीबलमध्ये तीन दहशतवाद्याचा खात्मा - Mangalwedha Times

Breaking

Sunday, June 21, 2020

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या जैदीबलमध्ये तीन दहशतवाद्याचा खात्मा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । जम्मू- काश्मीरमधील श्रीनगरच्या जैदीबल परिसरात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्याविरुद्ध वेगवान मोहीम सुरू केली होती. आज सकाळ पासून सुरू असलेल्या प्रत्यूत्तर गोळीबारात या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. Three terrorists killed in Srinagar, Jammu and Kashmir

आज भारतीय जवानांना श्रीनगरच्या जैदीबल परिसरातील एका घरात तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे भारतीय जवानांनी त्या घराला घेरा घातला. त्यावेळी जवानांनी त्यांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

मात्र याला यश आले नाही. यानंतर यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबाराला चोख प्रत्यूतर देत केलेल्या गोळीबारात एका दहशतवादाच्या खात्मा झाला असून अजून दोन दहशतवादी घरातच लपल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अजून सुरक्षा दलांत आणि दहशतवाद्यांत गोळीबार सुरू Security forces and terrorists continue firing आहे. त्यानंतर आता हाती आलेल्या माहितीच्या आधारे येथे लपलेल्या आळखीन एका दहशतवाद्याचा खात्मा झाला The terrorist was eliminated आहे. तर आत्मसमर्पणाची संधी देऊनही भारतीय जवानांवर गोळीबार करणाऱ्या तिसऱ्या दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले.

काश्मीरच्या पोलिस महानिरिक्षक यांच्या म्हणण्यानुसार, सीआरपीएफ व्हॅली क्यूएटी (क्विक अॅक्शन टीम), सीआरपीएफच्या ११५ व २८ बटालियन आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या तुकड्यांनी श्रीनगरच्या जैदीबल परिसरात संयुक्तपणे शोधमोहिम हाती घेतली होती. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला आणि तो अजूनही सुरू आहे.

हा परिसर रिकामा करण्यात आला असून सीआरपीएफ टीम, सीआरपीएफ व्हॅली क्यूएटी (क्विक अॅक्शन टीम) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई सुरू केली आहे. घटनास्थळी गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहेत आणि ज्या घरात दहशतवादी लपून बसले आहेत तेथून धूर निघताना दिसत असल्याचेही काश्मीरच्या पोलिस महानिरिक्षकांनी सांगितले आहे. तसेच या तिघांपैकी दोघेजण २०१९ पासून दहशतवादी कारवायात सक्रीय आहेत. तर गेल्या महिन्यात बीएसएफच्या दोन जवानांवर जो हल्ला झाला होता त्यात यातील एकाचा सहभाग होता, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment