कोरोना संकट : सोलापुरात सोमवारी तिघांचा बळी ; 27 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

कोरोना संकट : सोलापुरात सोमवारी तिघांचा बळी ; 27 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्हटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात सोमवारी नव्याने 27 रुग्णांची भर पडली असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे अद्यापही प्रलंबित अहवाल शून्यच असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. शहरातील रुग्ण संख्या आता दोन हजारांकडे वाटचाल करु लागली आहे. आतापर्यंत एक हजार 957 व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली असून 213 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकूण एक हजार 59 रुग्ण बरे झाल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले. Corona crisis: Three killed in Solapur on Monday;  27 new patients corona positive

65 वर्षांवरील तिघांचा झाला मृत्यू

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संसर्गाची साखळी तुटलेली नाही. दुसरीकडे मृत्यूची संख्याही कमी झालेली नाही.

सोमवारी (ता. 22) तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये कामाक्षी नगर, शेळगी येथील 65 वर्षीय, भोई गल्ली, शुक्रवार पेठेतील 70 वर्षीय तर सर्वोदय हौसिंग सोसायटी, विजयपूर रोडवरील 77 वर्षीय व्यक्‍तीचा समावेश आहे. Solapur city corona virus update, monday three killed , 27 new corona patients

सापडले 27 रुग्ण 'या' परिसरातील

सरवदे हौसिंग सोसायटी, विजयपूर रोड, हनुमान नगर, भवानी पेठ, सुंदरम नगर, विजयपूर रोड, सोमवार पेठ, विरशैवनगर, जुळे सोलापूर, विष्णू मिल चाळ, देगाव रोड, अंबाबाई मंदिर, विरलिंगेश्‍वर मंदिर, सिव्हिल हॉस्पिटल, मल्लिकार्जुन मंदिराजवळ, बुधवार पेठ, बुधले गल्ली, दक्षिण कसबा, शिवाजी नगर, तुळशीदास नगर, धमश्री लाईन, मुरारजी पेठ, सिंधू विहार, विजयपूर रोड, गवरानगर, निराळे वस्ती, विणकर वसाहत, रेसिडेन्सी कॉर्टर, सिव्हिल हॉस्पिटल, जुनी पोलिस लाईन, मुरारजी पेठ, साठे-पाटील वस्ती, देगाव रोड, पद्मा नगर, कर्णिक नगर आणि भवानी पेठ या परिसरात सोमवारी (ता. 22) नवे 27 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

No comments:

Post a Comment