मंगळवेढा पोलिस ठाण्यासमोरच्या बँकेतील एटीएम फोडण्याचा चोरटयांनी केला प्रयत्न - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, June 24, 2020

मंगळवेढा पोलिस ठाण्यासमोरच्या बँकेतील एटीएम फोडण्याचा चोरटयांनी केला प्रयत्नमंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा शहरातील पोलिस स्टेशनच्या समोर असलेली बँक ऑफ इंडियाचे Bank of India शटर तोडून आत प्रवेश करून कॅमेरा फोडून ए.टी.एम.मधील पैसे चोरण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला. मात्र तो प्रयत्न असफल ठरल्याने आतील कॅश सुरक्षित राहिली.या प्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. Thieves tried to break into a bank ATM in front of Mangalwedha police station

या घटनेची हकिकत अशी, पंढरपूर रोडवर पोलिस स्टेशनच्यासमोर शिवाजीराव पवार यांच्या मालकीच्या जागेत बँक ऑफ इंडियाची शाखा कार्यरत आहे. दि.२३ रोजी रात्री १.०० ते २.०० च्या दरम्यान अज्ञात चोरटयाने बँकेची पाठीमागून लाईट बंद करून बँकेच्या समोर असणाऱ्या एटीएममध्ये प्रवेश केला.बँकेच्या नावे तीन ए.टी.एम. मशिन असून त्यातील एक मशिन पैसे भरून घेणे व काढणे अशी आहे. तर दोन मशिन या फक्त पैसे काढण्याकरीता आहेत.

याची सर्व जबाबदारी एफआयएस , मुंबई यांच्याकडे आहे.ए.टी.एम. मशिनच्या सुरक्षिततेसाठी तीन सी.सी.टि.व्ही.कॅमेरे बसविण्यात आले आहेत.बँकेचा एक गार्ड सुरक्षिततेसाठी आहे.चोरटयाने समोरील ए.टी.एम.चा पत्रा उचकटला आहे.तसेच चोरटयाने समोर असलेला सी.सी.टी.व्ही . कॅमेरा फोडून नुकसान केले आहे.ए.टी.एम.चे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल झाल्याने आतील पैसे सुरक्षित राहिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून याची फिर्याद प्रबंधक नरेंद्र कंधारी यांनी दिली आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान , बँक ऑफ इंडिया ही पोलिस स्टेशनच्या समोर असतानाही चोरटयांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला यावरून चोरटयाचे धाडस वाढल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर शहरातून होत होती.पोलिस स्टेशन व बँक यांच्यामध्ये अंदाजे ५० ते ६० फुटाचे अंतर असताना एटीएमचा पत्रा कापताना रात्रपाळीतील ठाणे अंमलदार झोपले होते की काय अशी शंका नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

पोलिस ठाण्यासमोरच असलेल्या बँकेतील एटीएम चोरटयाने फोडल्याने पोलिसांच्या कर्तव्यावरच आता शंका व्यक्त होत आहे.

Thieves try to break into Bank of India ATM in Mangalwedha

----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment