सोलापुरात संचारबंदीचा निर्णय तूर्त नाही ; मात्र 'हा' नियम पाळावे लागणार - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

सोलापुरात संचारबंदीचा निर्णय तूर्त नाही ; मात्र 'हा' नियम पाळावे लागणारमंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी शहरात एक लाख तर जिल्ह्यात पन्नास हजार रॅपिड टेस्ट घेण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सोलापुरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय तूर्त पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. The decision to impose curfew in Solapur is not immediate;  One and a half lakh rapid tests will be taken

दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी सोलापुरातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली़ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी़ शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ व इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पालकमंत्री भरणे यांनी पोलीस आयुक्त शिंदे व पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली. शहर व जिल्ह्यात रॅपिड टेस्ट घेण्यावर अधिकाऱ्यांनी एकमत दर्शविले, त्यामुळे तूर्तास संचारबंदी लागू करण्याविषयी हा उपाय करून पाहण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

साथीचा संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे फिजिकल डिस्टन्स, मास्क वापरणे बंधनकारक करणे व नियम तोडणाºयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री भरणे यांनी दिले. सोलापुरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे महापालिका आयुक्त पी़ शिवशंकर व जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शहरात पुन्हा एकदा संचारबंदी लागू करावी लागेल असा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सोलापुरात कडक संचारबंदी लागू होणार म्हणून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. अनेक नागरिकांनी किराणा माल भरण्यास सुरुवात केली होती तर बऱ्याच संघटनांनी याला विरोध केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी विश्रामगृह येथे पालकमंत्री भरणे यांची भेट घेऊन संचारबंदी लागू करू नये या मागणीचे निवेदन दिले होते, त्यावर पालकमंत्री भरणे यांनी पोलिस अधिकाºयांची चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते.

आज गुरुवारी दुपारी बैठकीत पालकमंत्री भरणे यांनी पोलीस आयुक्त शिंदे व पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला . शहटातील कोटोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली. शहर व ग्रामीण भागात टॅपिड टेस्ट घेण्यावर वरिष्ठ अधिकायांचं एकमत झाले असल्याने तूर्तास संचारबंदी पुढे ढकलण्यात आलीय . कोरोना विषाणू संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणे सोशल डिस्टन्स , मास्कचा वापर बंधनकारक व नियम तोडणायांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री भरणे यांनी दिले.

No comments:

Post a Comment