Fact Check : कोरोना विषाणू नोव्हेंबरमध्येच युरोपात पॅरिस - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

Fact Check : कोरोना विषाणू नोव्हेंबरमध्येच युरोपात पॅरिस


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणूच्या उत्पत्तीवरून जगभरात संभ्रम असताना मध्यंतरी फ्रान्सने पॅरिसजवळच्या उपनगरात डिसेंबर अखेरीस दरम्यान उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णाच्या शरिरात कोरोना विषाणूचा संसर्ग होता , असा दावा केला होता.


या दाव्यानंतर फ्रान्सने २०१९ मध्ये देशभरात दाखल झालेल्या रुग्णांची माहिती तपासली . त्यातून देशात नोव्हेंबरच्या अगोदरपासून विषाणू फैलावत होता,असा निष्कर्ष काढण्यात आला. कोलमार येथील अल्बर्ट श्वात्झनर रुग्णालयाचे डॉ.मायकल श्मिट यांना कोरोना विषाणूचे अस्तित्व दाखवणारे छातीचे दोन एक्स - रे मिळाले. हे दोन्ही एक्स - रे नोव्हेंबर १६ ते १८ दरम्यान काढले आहेत.

श्मिट यांच्या चमूने आतापर्यंत जवळपास अडीच हजार एक्स - रेंची तपासणी केली . महत्त्वाचे म्हणजे फ्रान्समध्ये २४ जानेवारीला पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता . त्यानंतर फ्रान्सने पॅरिसजवळच्या रुग्णालयात डिसेंबरदरम्यान दाखल झालेल्या रुग्णात कोरोना विषाणू दिसल्याचे म्हटले होते.


हा रुग्ण डॉ. युवेस कोहेन यांच्या चमूला फेर तपासणीदरम्यान सापडला होता. हा रुग्ण बरा होऊन घरीही गेला. त्याची पत्नी एका सुपरमार्केटमध्ये कामाला होती. तिला संसर्ग झाला नव्हता , मात्र तिच्या दोन मुलांमध्ये संसर्ग दिसून आला होता. श्मिट यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काळात विषाणूमुळे फक्त फुफ्फुसांमध्येच घडामोडी झाल्याचे दिसले. शरिराच्या इतर भागांत त्याचा फारसा संसर्ग दिसला नाही. त्यांनी डिसेंबरमध्ये १२ आणि जानेवारीत १६ कोरोनाबाधित रुग्ण दिसल्याचे एक्स - रे तपासणीवरून सांगितले.

The corona virus spread to Europe in November

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा