राज्यातील परिस्थिती चिंताजनक ; उद्या केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

राज्यातील परिस्थिती चिंताजनक ; उद्या केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार


मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । देशभरात कोरोना व्हायरसचा Coronavirus प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात येणार आहे. आजपासून केंद्रीय पथकाच्या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे.

हे पथक आज गुजरातमध्ये दाखल होईल. तर उद्या हे पथके महाराष्ट्रात येणार आहे.  The situation in the state is worrisome;  The central team will arrive in Maharashtra tomorrow

राज्य सरकार मुंबईसह राज्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचे सांगत आहे. मात्र, महाराष्ट्रातील मृत्यूदर हा ४.७ इतका आहे.  राष्ट्रीय पातळीवरील सरासरी मृत्यूदर ३.२ टक्के आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे ६,७३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार आहे.

No comments:

Post a Comment