सीमेवरून सर्वात मोठी बातमी, लडाखमध्ये भारताच्या ताब्यात होता चीनचा कर्नल - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 22, 2020

सीमेवरून सर्वात मोठी बातमी, लडाखमध्ये भारताच्या ताब्यात होता चीनचा कर्नल


मंगळवेढा टाइम्स ऑनलाईन । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशातच एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्याने चीनच्या कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं होतं. 10 भारतीय सैनिकांची चीनने सुटका केल्यानंतरच चीनच्या कर्नलला सोडण्यात आलं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
The biggest news from across the border was that the Indian colonel in Ladakh was a Chinese colonel

'फक्त चीननेच भारतीय सैनिकांना सोडलं नाही, तर आपणही त्यांच्या अनेक सैनिकांना सोडून दिलं आहे,' अशी माहिती याआधीच केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल वीके सिंह यांनी दिली होती. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर चीन सैन्यानेही 10 भारतीय जवानांना ताब्यात घेतलं होतं. ताज्या माहितीनुसार चीनकडून भारतीय सैन्याला सोडण्यात आलं आहे. मात्र याबाबत लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

चीनसोबतच्या संघर्षानंतर काही भारतीय सैनिक बेपत्ता आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमाकडून देण्यात आले होते. मात्र हे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळून लावलं होतं. 'कारवाई दरम्यान कोणताही भारतीय जवान बेपत्ता नाही,' असं लष्कराकडून सांगण्यात आलं होतं.

No comments:

Post a Comment