सोलापूर जिल्हा न्यायालय आठ जूनपासून सुरू होणार - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ६ जून, २०२०

सोलापूर जिल्हा न्यायालय आठ जूनपासून सुरू होणार


टीम मंगळवेढा टाईम्स । येत्या आठ जूनपासून जिल्हा न्यायालयातील कामकाज सकाळी साडेदहा ते एक व दुपारी अडीच ते सांयकाळी साडेपाच यावेळेत चालणार आहे .यासाठी काही नियमावली व अटी उच्च न्यायालयाने घालून दिल्या आहेत. राज्यातील काही शहरांचे वर्गीकरण कामकाजासाठी अ आणि ब असे ग्रुप तयार केले आहेत.

अ ग्रुप मध्ये सोलापूर , पुणे , नाशीक , मालेगाव , धुळे , जळगाव , अकोला , अमरावती आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे . ब ग्रुप मध्ये अन्य शहरांचा समावेश आहे . ही माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग रजपूत यांनी दिली . न्यायालयात १५ टक्के स्टाफ उपस्थित राहील ,

लॉकडाऊनपूर्वी दाखल जामीन अर्ज , साक्षीदारांची साक्ष न होणारी खटले , अपील , निकाल , अत्यावश्यक आदेश हे कामकाज चालतील , साक्षीदाराची साक्ष व्हिडीओ कॉन्फरसद्वारे घेण्याची मुभा , अंतिम युक्तीवाद व्हिडीओ कॉन्फरसद्वारे किंवा लेखी स्वरूपात द्यावा , नियमित १५ केसेस कामकाजासाठी घ्यावेत , शरात अचान कंटेनमेंट झोन तयार झाल्यास त्याची पाहणी व्यावस्थपक समिती करेल आणि त्यांच्या निर्णयानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल , अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा