सोलापुरात स्वॅबची तपासणी होणार लवकर ; खासगी लॅबला मिळाली परवानगी - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

सोलापुरात स्वॅबची तपासणी होणार लवकर ; खासगी लॅबला मिळाली परवानगी


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील बाधितांची संख्या व थेट संपर्कातील लोकांच्या स्वबची तपासणी लवकर व्हावी,कोरोना बाधा झाल्याची शंका असल्याच्या नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी पुणे येथील क्रस्ना डायग्नोस्टिक या खासगी लॅबशी सामंजस्य करार केला आहे.

लक्षणे असलेली व्यक्ती जीवनदायी योजनेत सहभागी असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास त्यांनाखर्च करण्याची गरज भासणार नाही.मात्र योजनेच्या व्यतिरिक्त असलेल्यांना तपासणीसाठीचे पैसे द्यावे लागणार आहेत. खासगी लॅबमुळे सिव्हिलवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांनी दिली.
क्रस्ना लॅबच्या माध्यमातून नियमित संलग्न असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्यांचे स्वब घेतले जातील . 


तसेच स्वॅब घेतल्यानंतर कै . जयाबाई नानासाहेब सुतार रुग्णालय पुणे येथे तपासणी केली जाईल. या लॅबला भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद दिल्ली ( आयसीएमआर ) या संस्थेकडून कोविड -१ ९ चाचणी करण्याची परवानगी दिलेली आहे.

स्वब तपासणी आर.टी-पी.सी.आर. अत्यंत अद्ययावत पद्धतीने करण्यात येते . क्रस्ना लॅबकडे कितीही स्वबचे नमुने पाठवले तरी ते २४ तासात संबंधित हॉस्पिटलला रिपोर्ट पाठवणार आहेत . ही संस्था पॅथॉलॉजीमध्ये मागील दहा वर्षांपासून भारतातील १५ राज्यांमध्ये १८० पेक्षा जास्त केंद्रांवर सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर यशस्वीरीत्या आरोग्य सेवा देण्याचे काम करत आहे.

भारतातील सर्वात प्रथम मुंबई व त्यापाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे कोविड -१ ९ फिरती अद्ययावत चाचणी बस याच संस्थेमार्फत सुरू करण्यात आली आहे.

आजपासून खासगी सेवा सुरू

१ जून २०२० पासून सोलापूर शहरातील नागरिकांचे कोविड -१ ९ स्वॅब संकलन ( घशातील स्त्रावाचे नमुने ) करून चाचणी प्रक्रिया संस्थेमार्फत तपासनीस पाठवले जाणार आहेत.

याबाबत अधिक माहितीसाठी समन्वयक दत्तात्रय वारे ( ७४२००१४१२२ ) यांच्याशी संपर्क साधावा. त्याचबरोबर सोलापुरात मेट्रोपोलीस लॅबमध्येही स्वब संकलन आणि तपासणीस मंजुरी मिळाली आहे . त्या संदर्भात डॉ.रमीज ७७४१९१८८५७ यांच्याशी संपर्क साधावा.

Swab inspection to be held soon in Solapur Private lab granted permission

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा