विजयपूर येथे पोलिसांनी पकडलेले संशयित कोरोनाबाधित - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

विजयपूर येथे पोलिसांनी पकडलेले संशयित कोरोनाबाधित


टीम मंगळवेढा टाईम्स । दोन दिवसांपूर्वी विजयपूर जिल्ह्यातील आलमेल पोलिसांनी तीन संशयित आरोपींना सोने चोरीप्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. Suspected corona caught by police at Vijaypur

या आरोपींना हिरेबेवनूर गावाजवळ अटक केली होती. त्यानंतर सिंदगी येथे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. याचबरोबर कोविड -१ ९ स्वब टेस्ट पण केली होती. यानंतर त्यांची विजयपूरच्या दर्गा जेलमध्ये रवानगी केली होती.

आज त्यांचे कोरोना अहवाल आले. तीन संशयितांपैकी दोघांचा अहवाल बाधित आला आहे . या अहवालानंतर त्या दोन आरोपींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे.

या आरोपींची चौकशी केलेल्या दोन पोलिस उपनिरीक्षक व ३७ पोलिस शिपाई यांना क्वारंटाइन केले आहे. 

No comments:

Post a Comment