चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून भारतीय सैनिकांना पांठीबा द्या : संदिपराजे मुटकुळे - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 18, 2020

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून भारतीय सैनिकांना पांठीबा द्या : संदिपराजे मुटकुळे


मंगळवेढा टाईम्स टीम । भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी 130 कोटी भारतीयांना चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आव्हान केले आहे. Support Indian troops by boycotting Chinese goods: Sandiparaje Mutkule

चीनच्या गोळीबाराला भारतीय सैन्य योग्य वेळी त्या ठिकाणी उत्तर देईल.मात्र भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहावं भारतीयांना वस्तू विकून मिळालेल्या नफ्यातून चीन आपल्या भारतावर आक्रमक झाल्याचं मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी व्यक्त केले.

१९६९नंतर भारत आणि चीन हद्दीवर कधीही गोळीबार झाला नव्हता.मात्र त्यानंतरची झालेले ही घटना गंभीर आहे.यानंतर आता भारतीय सैन्य कुठं कधी आणि कशा पद्धतीने प्रतिहल्ला करेल हे एक म्हत्वाचं आहे. हा एक सैनिक निर्णय असून तो योग्य वेळी ठिकाणी सैन्य निर्णय घेईन.यावेळी चीनची आक्रमकता वाढली आहे. लडाखमध्ये त्यांनी भारतीय सैनिकांवर काठीने हल्ला केला आणि आता गोळीबार केल्याने हे गंभीर आहे.

त्याला प्रत्युत्तर हे घ्यायलाच हवे यासंदर्भात सर्व भारतीयांनी एक जूट होऊन भारतीय सैन्यासोबत उभं राहिलं पाहिजे अशा पाश्रर्वभुमीवर चीन वस्तूवर घातलेला बहिष्कार हा भारतीय नागरिकांचा योग्य निर्णय होईल.यापुढे भारतात चीनच्या वस्तू आयात होऊ देवू नये.भारत देशातील सर्व भारतीय बांधव देशातील जवान्याबरोबर आहोत.आणि चीनच्या सर्व वस्तूवर बहिष्कार टाकून चीनचा जाहीर निषेध करावा असे आव्हान शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment