धक्कादायक : मंगळवेढ्यात एकाच दिवशी एकाच गावातील दोन तरुणांच्या आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

धक्कादायक : मंगळवेढ्यात एकाच दिवशी एकाच गावातील दोन तरुणांच्या आत्महत्या


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे लग्न जमत नसल्याने निराश झालेल्या २३ वर्षीय युवकाने डाळिंब पिकावर फवारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दि.२५ रोजी दुपारी सलगर बु.येथे घडली असून दिलीप नामदेव धायगोंडे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. Suicide of two youths on the same day in salagar budruk mangalwedha

दरम्यान पोलिसांनी या घटनेची सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे नोंद केली आहे.


या घटनेची हकिकत अशी , सलगर येथील मयत दिलीप नामदेव धायगोंडे याचे लॉकडाऊनमुळे लग्न जमण्यास विलंब होत असल्याने निराश झाल्याने दि.२५ रोजी दुपारी ३.०० वा.सलगर येथील शेतातील घरासमोर डाळिंब पिकावर फवारण्याचे औषध प्राशन केल्याने तो मयत झाला.

याची खबर चुलता बसवराज धायगोंडे यांनी पोलिसात दिल्यावर पोलिसांनी आकस्मात मयत अशी नोंद केली आहे.दरम्यान पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.अधिक तपास पोलिस नाईक देशमुख हे करीत आहेत.


तर दुसऱ्या घटनेत दारूच्या नशेत २४ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली.ही घटना सलगर बु .येथे घडली असून विनायक वाल्मिकी कोळी असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी आकस्मात मयत अशी या घटनेची नोंद केली आहे.

या घटनेची हकिकत अशी,यातील मयत विनायक कोळी याला दारू पिण्याचे व्यसन होते .दि. २५ रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान शेतातील घराचे पत्र्याच्या पाईपला वायरने गळफास घेवून आत्महत्या केली.याची खबर लक्ष्मण कोळी याने पोलिसात दिली आहे.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


No comments:

Post a Comment