मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी दोघींची गळफास घेऊन आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी दोघींची गळफास घेऊन आत्महत्या


सुरज फुगारे । मंगळवेढा तालुक्यातील रड्डे व लक्ष्मी दहिवडी येथे महिला व मुलीनी आत्महत्या केल्याची घटना घडली. Suicide by hanging on the same day in Mangalvedha taluka radde and laxmi dahivadi

पहिल्या घटनेत लक्ष्मीदहीवडी येथील आरती संतोष बनसोडे (वय २१) हिने सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास पत्र्याच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद रमेश बनसोडे यांनी दिली.

तर दुसऱ्या घटनेत रड्डे येथील पायल कैलास कुचेकर (वय १८) या मुलीने अज्ञात कारणावरून ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद तिचा मामा सोमनाथ साठे (रा.माळखांबी,ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली.

----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment