सोलापुरातील प्रत्येक प्रभागात फिव्हर ओपीडी सुरु करा - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ५ जून, २०२०

सोलापुरातील प्रत्येक प्रभागात फिव्हर ओपीडी सुरु करा


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून प्रत्येक प्रभागात दोन ते तीन फिव्हर ओपीडी सुरु कराव्यात अशी मागणी विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नगरसेवकांनी केली. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने त्याला नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक व झोन समिती सदस्यांची विभागीय कार्यालय क्रमांक पाच येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीत झोनल अधिकारी श्रीकृष्ण आलमेलकर यांनी कोरोना संदर्भाच्या उपाययोजनांची माहिती दिली . सर्व नगरसेवकांनी आपली मते व सूचना यावेळी व्यक्त केल्या.


परिवहन खात्याने तयार केलेला फिरता दवाखाना प्रत्येक प्रभागात पाठवावा , त्याचे वेळापत्रक तयार करावे. संबंधित व्यक्तीचा फोन नंबर नगरसेवकांना देण्यात यावा, जेणेकरून या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करणे सोपे जाईल असे नगरसेवकांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा