सोलापूर ग्रामीणमध्ये ६ जण कोरोनामुक्त तर एका महिलेचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, June 24, 2020

सोलापूर ग्रामीणमध्ये ६ जण कोरोनामुक्त तर एका महिलेचा मृत्यूसमाधान फुगारे।  सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला नाही.आज सहाजणांना उपचारानंतर सोडण्यात आले असून आजवर कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्यांची संख्या 95 झाली आहे. In Solapur village, 6 people were released from corona and one woman died

तर 108 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज एकूण 120 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 24 अहवाल प्रलंबित आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 2978 जणांचे स्वब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 2954 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत.

एकूण पॉझिटिव्ह अहवाल 215 आहेत तर 2740 निगेटिव्ह आहेत. आज एक जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा 12 झाला आहे .

मयत 60 वर्षीय महिला

मयत झालेली व्यक्ती बागवान गल्ली, अक्कलकोट येथील 60 वर्षाची महिला असून त्यांना दि . 09/06/2020 रोजी सायंकाळी 05.48 वाजता यशोधरा हॉस्पीटल , सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान दि. 23/06/2020 रोजी सायंकाळी 04.30 वा त्यांचे निधन झाले. त्यांचा कोव्हीड -19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment