सोलापूर ग्रामीणमध्येही कोरोनाचा कहर सुरुच ; या' भागात 6 नवे रुग्ण आढळले - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

सोलापूर ग्रामीणमध्येही कोरोनाचा कहर सुरुच ; या' भागात 6 नवे रुग्ण आढळले


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या शुक्रवारी 266 झाली असून आज 6 नवे रूग्ण आढळून आले आहेत . यात अक्कलकोट तालुक्यातील 4 तर दक्षिण सोलापूर तालुक्यात 2  नवे रुग्ण आढळून आले आहेत. ( Solapur rural corona virus update )


आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 119 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 6 पॉझिटिव्ह आहेत तर 113 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 266 झाली आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यात 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 99 जण घरी परतले आहेत.153 जणांवर उपचार सुरू आहेत.

आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे 1 पुरुष व वांगी येथे 1 पुरुष तर  अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे 1 महिला ,बोरगाव येथे 1 महिला व बुधवार पेठ येथे 1 पुरुष व 1 महिला असे या भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत

तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः


अक्कलकोट 50 , बार्शी 39 , करमाळा 1 , माढा 7 , माळशिरस 5 , मोहोळ 14, उत्तर सोलापूर 18 , पंढरपूर 7 , सांगोला 3, दक्षिण सोलापूर 122. असे एकूण 266 रुग्ण
---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


No comments:

Post a Comment