सोलापूर ग्रामीणच्या 'या' भागात 11 नव्या रुग्णांची भर : बाधितांची संख्या 215 वर - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

सोलापूर ग्रामीणच्या 'या' भागात 11 नव्या रुग्णांची भर : बाधितांची संख्या 215 वर



मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या सोमवारी 215 झाली असून आज 11 नवे रूग्ण आढळून आले आहेत . यात अक्कलकोट तालुक्यातील 3 तर एक मोहोळ तालुक्यातील वाळूज व क्रांतीनगर येथे 3  नवे रुग्ण आढळून आले आहेत. ( Solapur rural corona virus update )

आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 95 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 11 पॉझिटिव्ह आहेत तर 84 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 215 झाली आहे. ( यात एक रूग्ण पुण्यात पॉझिटिव्ह आढळला आहे ).

कोरोनामुळे जिल्ह्यात 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 89 जण घरी परतले आहेत.115 जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे 1 रुग्ण व करदेहल्ली येथे 2 , उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे 1 व बीबी दारफल येथे 1 , अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी येथे 1 व बुधवार पेठ येथे 2 असे 11 नवे रुग्ण आढळून आले आहेत 
.
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः

अक्कलकोट 40 , बार्शी 30 , करमाळा 1 , माढा 7 , माळशिरस 5 , मोहोळ 13, उत्तर सोलापूर 15 , पंढरपूर 7 , सांगोला 3, दक्षिण सोलापूर 94. असे एकूण 215 रुग्ण

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment