सोलापूर ग्रामीणच्या 'या' भागात 17 नव्या रुग्णांची भर : बाधितांची संख्या 361 वर - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 30, 2020

सोलापूर ग्रामीणच्या 'या' भागात 17 नव्या रुग्णांची भर : बाधितांची संख्या 361 वर


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या मंगळवारी 361 झाली असून आज 17 नवे रूग्ण आढळून आले आहेत . यात उत्तर सोलापूर तालुक्यात 4 रुग्ण आढळले आहेत तर अक्कलकोट  तालुक्यात 2 व  पंढरपूर तालुक्यात 7 तर मोहोळ मध्ये 4 रुग्ण असे आज मंगळवारी 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ( Solapur rural corona virus update )


आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून )  129 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 17 पॉझिटिव्ह आहेत तर 112 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 361 झाली आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यात 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 142 जण घरी परतले आहेत.202 जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान आज बाणेगाव , ता.उत्तर सोलापूर . ति - हे , ता.उत्तर सोलापूर . मार्डी , ता.उत्तर सोलापूर . गाताडे प्लॉट , पंढरपूर भक्त निवास , पंढरपूर . रुक्मिनी नगर , पंढरपूर . घोडके गल्ली , पंढरपूर औदुंबर पाटील नगर , पंढरपूर नवी पेठ , पंढरपूर . जुनी पेठ , पंढरपूर क्रांती नगर , मोहोळ . महबुब नगर , मोहोळ . नागनाथ गल्ली , मोहोळ . जेऊरवाडी , ता . अक्कलकोट . बोरगाव ( दे . ) , ता . अक्कलकोट या ठिकाणी नवे रुग्ण आढळून आले आहेत .
 

तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः

अक्कलकोट 69 , बार्शी 51 , करमाळा 1 , माढा 8 , माळशिरस 5 , मोहोळ 21, उत्तर सोलापूर 28 , पंढरपूर 16 , सांगोला 3, दक्षिण सोलापूर 159 . असे एकूण 361 रुग्ण

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment