सोलापूर । अंत्यविधी करण्यासाठी गावी गेल्यावर फोडले घर साडेतीन लाख रुपयांचे ऐवजांची चोरी - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ७ जून, २०२०

सोलापूर । अंत्यविधी करण्यासाठी गावी गेल्यावर फोडले घर साडेतीन लाख रुपयांचे ऐवजांची चोरी


टीम मंगळवेढा टाईम्स । वडीलांचे अत्यविधी करण्यासाठी गावी गेल्याची संधी साधत चोराने घर फोडून 3 लाख ५२ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना बाळे परीसरात घडली.याबाबत शिवाजी पांडूरंग वाघमारे ( वय ४० , रा.वाघोली , ता . मोहोळ , सध्या डांगे नगर , बाळे ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की , शिवाजी वाघमारे यांचे वडील आजारी होते.त्यांच्या उपचारासाठी त्यांनी घरी रोख दोन लाख रुपये आणून ठेवले होते.पण शिवाजी यांच्या वडीलांचे ३ जून रोजी निधन झाले.यामुळे वडीलांचे अंत्यविधी करण्यासाठी वाघोली येथे गेले होते.घरातील किमती ऐवज त्यांनी लाकडी कपाटात ठेवले होते.

दरम्यान तीन जून ते शनिवार ६ जून रोजीच्या मध्यरात्री पर्यंत अज्ञात चोराने घराचा कडी कोयंडा उचकाटून घरातील कपाटामधील रोख रक्कम आणि दीड लाख रुपयांचे सोन्याचे ऐवज असे एकूण तीन लाख ५२ हजार रुपयांची चोरी केली .

ही घटना शनिवारी सकाळी वाघमारे यांच्या घरा शेजारील लोकांनी त्यांना फोनव्दारे माहिती दिल्यानंतर त्यांना कळाली.याबाबत शिवाजी वाघमारे यांनी फिर्याद दिली असून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरा विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा तपास पोसई देशमाने हे करत आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा