सोलापूरकरांनो सावधान ! आयसीयु फुल्ल सिव्हिल हॉस्पिटलची क्षमता संपली - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ५ जून, २०२०

सोलापूरकरांनो सावधान ! आयसीयु फुल्ल सिव्हिल हॉस्पिटलची क्षमता संपली


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये २३ सिरीयस रुग्ण होते. रात्री ११ च्या दरम्यान अजून २ सिरीयस रुग्णांना अ‍ॅडमिट करावे लागले. आपली २५ बेडची आयसीयु फुल्ल झाली आहे. सिरीयस रुग्णांना अ‍ॅडमिट करून घेण्याची सिव्हिल हॉस्पिटलची क्षमता संपली आहे. आता आणखी गोरगरीब रुग्ण आला, तर त्याला कुठे ठेवायचे, हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला असल्याची धक्कादायक माहिती सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.औदुंबर मस्के यांनी दिली आहे.


इतर वेळी ओढाचढीने रुग्णांना अ‍ॅडमिट करणार्‍या खाजगी रुग्णालयांनी या भीषण संकटात रुग्णालयाचे दरवाजे बंद ठेवले आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर या सर्वांनी खाजगी दवाखाने चालवणाऱ्यांना दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, खाजगी रुग्णालये दाद देईनात.


सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार 25 आयसीयु कक्ष आहेत. कोरोना झालेल्या वयस्क अथवा श्वास घेण्यास त्रास होत असलेल्यांना व्हेंटेलेटर लावावे लागते. मात्र, खासगी दवाखाने बंद असून तिथे कोणाला उपचारासाठी दाखल करुन घेतले जात नाही. आत्तापर्यंत आम्ही सरकारने जिल्हा प्रशासनाने सांगूनही खाजगी दवाखाने सुरू झालेले नाहीत. आता माध्यमाने आवाज उठवावा, अन्यथा कोरोनाचा कहर वाढून मृत्यूची संख्या अफाट होईल, असा सूचक इशारा सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के यांनी दिला आहे.


डॉ. मस्के म्हणाले.....

आत्ताच मी उपायुक्तांना फोन करून सांगितले आहे. उपायुक्तांनी तात्काळ चौकशी करून सांगतो असे सांगितले आहे. पण मला वाटत नाही की खाजगी रुग्णालये प्रतिसाद देतील म्हणून... बंधूंनो, न जाणो आपल्यापैकी कुणाच्या जवळच्या व्यक्तीला आज आय. सी. यु. उपचाराची गरज भासली तर काय करायच? खरंच... आजपर्यंतच्या वैद्यकीय क्षेत्रातील आयुष्यात एवढी हतबलता कधीच आली नव्हती..

माझ्या पत्रकार बांधवांनो, सर्व काही आता तुमच्याच हातात आहे.

मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो की गोरगरीब रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी काही तरी करा... लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ताकद काय असते हे दाखवून द्यायची यापेक्षा दुसरी कुठलीच संधी मिळणार नाही...

खाजगी रुग्णालये उघडायला भाग पाडा.. सर्व उपाय खुंटले आहेत. फक्त आणि फक्त तुमच्यावरच आता भरोसा आहे.  सोलापूरचे गोरगरीब रुग्ण तुम्हाला आयुष्यभर दुवा देतील.
- डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधिक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर

महात्मा फुले जनआरोग्य ना 'आयुष्यमान भारत' चा लाभ

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील खाजगी दवाखाने सुरू करा, अन्यथा परवाने रद्द करू असं वारंवार इशारा दिला. मात्र, दवाखान्यांचा दरवाजा उघडा आतील सेवा मात्र बंदच अशी स्थिती राज्यात दिसत आहे. दुसरीकडे सरकारी दवाखान्यात मधील आयुष्य बेडची क्षमता मर्यादित असल्याने कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्या अत्यव्स्थ वयस्क रुग्णांना दाखल करून घेणे कठीण जात आहे. मोदी सरकारने covid-19 रुग्णांना आयुष्यमान भारत योजना अंतर्गत लाभ दिला जाईल, अशी घोषणा केली. तर त्यापाठोपाठ राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांना मोफत उपचार केले जातील, असे जाहीर केले. मात्र, या योजनेअंतर्गत असलेली राज्यातील 1000 पैकी 70 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णालयांची सेवा बंद असल्याची विदारक स्थिती, पहायला मिळत आहे.

Solapur residents beware!  The capacity of ICU Full Civil Hospital has been exhausted

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा