सोलापूर ग्रामीण : 'या' भागात नवीन कोरोनाबाधित आढळला ; 12 नवे रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 19, 2020

सोलापूर ग्रामीण : 'या' भागात नवीन कोरोनाबाधित आढळला ; 12 नवे रुग्णसमाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना आता डोके वर काढू लागला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या अहवालानुसार मोहोळ तालुक्‍यातील चिखली येथे सारीचा तर अकलूज (ता. माळशिरस) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 161 इतकी झाली आहे. ( Solapur rural corona updated)

आज आलेल्या अहवालामध्ये अकलूज, चिखली या दोन गावांशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामनी 1 पुरुष, व नवी विडीघरकुल येथे 1 स्त्री , उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी 1 पुरुष, वायकुळे प्लॉट बार्शी 1 पुरुष 1 स्त्री , मैदर्गी ता.अक्कलकोट 1 पुरुष, उल्लास नगर येथे 1 पुरुष व 2 स्त्रिया तर करजगी 1 पुरुष बाधित रुग्ण आढळून आला आहे. अकलूज,बार्शी, अक्कलकोट येथील रुग्ण हे संपर्कामुळे बाधित झाले आहेत. तर बोरामनी, पाकणी, नवीन विडीघरकुल येथील बाधित रुग्ण हे सारीचे आढळून आले आहेत.

आज 162 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 150 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर उर्वरीत 12 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 8 पुरुष व 4 स्त्रियाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 161 इतकी झाली आहे. आतापर्यंत 11 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत 69 जण रुग्णालयातून बरे होऊन घरे गेले आहेत. तर 81 बाधित रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तालुकानिहाय बाधितांची संख्या

अक्कलकोट-27, बार्शी-34, करमाळा-0, माढा-7, माळशिरस-5, मंगळवेढा-0, मोहोळ-6, उत्तर सोलापूर-12, पंढरपूर-7, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-77, एकूण-161.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment