सोलापुर ग्रामीण कोरोनाचा कहर सुरूच 18 नवे बाधित रुग्ण ; वाचा 'कुठे' वाढले - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 20, 2020

सोलापुर ग्रामीण कोरोनाचा कहर सुरूच 18 नवे बाधित रुग्ण ; वाचा 'कुठे' वाढलेसमाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील कुरूल दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी आणि अक्कलकोट तालुक्यातील गुरुववाडी येथे नव्याने १८ कोरोना रुग्ण आढळले आहेत अजून एकूण बाधितांची संख्या 179 वर गेली आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांनी दिली.
( Solapur rural corona virus update )
  
सिविल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून शनिवारी २३९ अहवाल आले त्यापैकी अठरा जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मोहोळ येथील क्रांतीनगर, तालुक्यातील वाळुज व कुरुल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

अक्कलकोट शहरातील एक व तालुक्यातील गुरववाडी येथील एक असे दोन रुग्ण आहेत. वैराग: दोन, बार्शी एक, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी : १, विडी घरकुल : ३, मुळेगाव : ६ असे रुग्ण आढळले आहेत.
---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment