गृहमंत्री,आरोग्यमंत्री यांच्या संपर्कात आलेले सोलापूरचे आयुक्त पी.शिवशंकर ‘कोरोना' पॉझिटीव्ह - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 29, 2020

गृहमंत्री,आरोग्यमंत्री यांच्या संपर्कात आलेले सोलापूरचे आयुक्त पी.शिवशंकर ‘कोरोना' पॉझिटीव्ह


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे आजारी पडले आहेत. परिणामी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. त्या स्वॅबची तपासणी झाली असुन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा रिपोर्ट ‘कोरोना पॉझिटीव्ह’ आला असल्याची माहिती  Guardian Minister Dattatraya bharane  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली.

Solapur Municipal Commissioner P. Shivshankar 'Corona' positive


महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रविवारी सकाळपासून सर्दी, ताप, डोकेदुखीचा त्रास सुरु होता. त्यामूळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी आला असुन यामध्ये महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना कोरोना झाल्याचे पालकमंत्रि दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

परिणामी आयुक्त पी. शिवशंकर यांना होम क्वॉरंटाईन केले आहे. ते घरुनच कामकाज पाहणार आहेत. तर नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे हे महापालिकेचे काम पाहणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या बरोबर व इतर अधिकाऱ्यांबरोबर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा बैठकीच्या दरम्यान संपर्क झाल्याने जिल्हाधिकारी यांना देखील सध्या कोणतेही लक्ष नसले, तरी घरूनच कामकाज करण्यासंदर्भात सूचना दिल्या असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या संपर्कात आले आयुक्त


दोन दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देश्मुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोलापुर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यानिमित्त विविध ठिकाणी बैठका झाल्या. यामध्ये जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, आरोग्य विभागातील अधिकारी सहभागी होते. यावेळी बैठकीदरम्यान आयुक्त शिवशंकर या सर्वांच्या संपर्कात आले होते. त्यामूळे या बैठकादरम्यान उपस्थीत सर्वांच्या तपासण्या केल्या जाणार का ? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

Solapur Commissioner P. Shivshankar 'Corona' positive after contacting Home Minister, Health Minister

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment