राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंगळवेढयाच्या 'या' सुपुत्रास आमदारकी मिळणार ? - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 22, 2020

राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंगळवेढयाच्या 'या' सुपुत्रास आमदारकी मिळणार ?


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक व मंगळवेढ्याचे सुपुत्र आनंद शिंदे Singer Anand Shinde यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार NCP President Sharad Pawar यांची कलावंतांच्या प्रश्नावर भेट घेतली. ही भेट कलावंतांचे प्रश्न मांडणारी होती. मात्र, या भेटीनंतर आनंद शिंदे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदारपदी संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. Singer Anand Shinde as MLA from NCP quota

आनंद शिंदे यांनी कोरोनाच्या काळात कलावंतांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले हे सांगण्यासाठी, कलावंतांच्या व्यथा मांडण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र राज्यपालनियुक्त विधानपरिषद जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आनंद शिंदे यांना संधी मिळणार काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

आनंद शिंदे यांनी मोहोळ मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र उत्कर्ष शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण मोहोळमधून यशवंत माने यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली.

महाराष्ट्रात सध्या राज्यपालनियुक्त विधानपरिषद जागांची चर्चा आहे. या जागांवर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्याही नावाची चर्चा विधानपरिषद जागेसाठी आहे. याचदरम्यान त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या कोट्यातून आनंद शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी मिळणार काय ? याची चर्चा सुरू झाली आहे.

आनंद शिंदे भेटले कलावंताच्या प्रश्नांसाठी. मात्र, चर्चा मात्र विधानपरिषदेची सुरू झाली आहे दरम्यान आनंद शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी "मी शरद पवार यांच्याकडे कलावंताचे प्रश्न घेऊन गेलो होतो. कलावंताचे प्रश्न सुटावेत, अशी माझी इच्छा आहे. विधानपरिषदेबाबत कोठे काय चर्चा सुरू आहेत हे मला माहिती नाही," असे सांगितले.

हे नक्की वाचा

-सोलापूर ग्रामीण 'या' तालुक्यात कोरोनाचे खाते उघडले ; अक्कलकोट मध्ये वाढता आलेख 

-मंगळवेढा ब्रेकिंग : 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणी निष्काळजीपणा दाखविणार्‍या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी

-SSC व HSC चा निकाल आणखी लांबणार? 'या' तारखांना लागण्याची शक्यता 

No comments:

Post a Comment