शाळा जुलैमध्ये सुरू होणार नाहीत : उपमुख्यमंत्री अजित पवार - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 27, 2020

शाळा जुलैमध्ये सुरू होणार नाहीत : उपमुख्यमंत्री अजित पवार


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज सुरू करण्याची घाई करू नये, अशी विनंती केली होती. त्यानुसार अजित दादांनी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडून जुलैमध्ये शाळा सुरू होणार नाहीत, असे आश्वासन आमदार कपिल पाटील यांना दिले. Schools will not start in July: Deputy Chief Minister Ajit Pawar

कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्याटप्याने सुरू करणेबाबत मार्गदर्शक सूचना याबद्दल 15 जून 2020 शालेय शिक्षण विभागाचा जीआर निघाला होता. त्यातील विसंगती व संभ्रम यामुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्याबाबतही आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार 24 जून 2020 रोजी नवीन जारी झालेल्या नव्या जीआरने संभ्रम दूर होऊन सर्वांना दिलासा मिळणार आहे.

नवीन जीआर मधील ठळक निर्णय -

◆ लॉकडाऊन काळात कोणत्याही परिस्थितीत महिला शिक्षकांना शाळेत बोलावलं जाणार नाही.

◆ 55 वर्षांवरील पुरुष शिक्षक आणि मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, ह्रदयविकार इ. सारखे गंभीर आजार असणारे शिक्षक यांना मुख्याध्यापक यांनी शाळेत बोलावू नये.

◆सरप्लस शिक्षकांना मूळ शाळेत परत बोलावणार.

◆ कोविड ड्युटीवर असणाऱ्या शिक्षक यांनाही कार्यमुक्त करून मूळ शाळेत परत बोलवणार.

◆ एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलवू नये.

◆ शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत.

स्थानिक शिक्षण अधिकारी वेगवेगळ्या प्रकारची पत्रकं काढत होते, त्यामुळे संभ्रम निर्माण होत होता. मात्र नवीन जीआर नुसार शाळा सुरू करणे, शिक्षकांना शाळेत बोलावणे याबद्दल शिक्षण अधिकारी / शिक्षण निरीक्षक यांनी कोणतेही आदेश परस्पर काढू नयेत असे स्पष्ट केल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन जीआर काढून विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार कपिल पाटील यांचे शिक्षक भारतीच्या वतीने आभार!- सुभाष किसन मोरे,कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

No comments:

Post a Comment