मुहूर्त अखेर सापडला ! शाळा, महाविद्यालये 'या' तारखेनंतर सुरू होणार ! - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ७ जून, २०२०

मुहूर्त अखेर सापडला ! शाळा, महाविद्यालये 'या' तारखेनंतर सुरू होणार !टीम मंगळवेढा टाईम्स । देशातील शाळा, महाविद्यालये ऑगस्ट महिन्यात सुरु करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश निशंक पोखरियाल यांनी दिली. विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांचा संभ्रम त्यामुळे दूर झाला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीसोबत बोलतांना पोखरियाल यांनी ही माहिती दिली. १५ ऑगस्ट नंतर सर्व शैक्षणिक संस्था सुरु होतील, असे संकेत त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी देशभरातील शाळांना पुढील आदेशांपर्यत बंद करण्यात आले आहे, हे विशेष.

शाळांना पुन्हा सुरु करण्याच्या योजनेसंबंधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी पोखरियाल यांना पत्र लिहले होते.
कोरोनाच्या अस्तित्वाचा स्वीकार करीत देशातील शाळांसंबंधीची भूमिका नव्याने तयार करण्याची वेळ आली असल्याचे मत सिसोदियांनी व्यक्त केले होते. पोखरियाल यांच्याकडून शैक्षणिक संस्थांसंबंधी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला आहे.

शाळांना साहसिक भूमिकेसाठी तयार करण्यात आले नाही, तर ही ऐतिहासिक चूक ठरेल. शाळांची भूमिका पाठ्यपुस्तकांपर्यंतच मर्यादीत राहणार नाही. मुलांना जबाबदारीने जीवन जगण्यासाठी तयार करणारी महत्वाची भूमिका शाळांवर राहणार आहे, असे सिसोदिया पत्रातून म्हणाले होते. कोरोना संकटामुळे दिल्लीतील शाळा मार्च महिन्यापासून बंद आहेत. अश्यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी दिली जात आहे. पंरतु, अनेक विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होत आहे, अशी भीती व्यक्त करीत शाळांना पुन्हा सुरु करण्याची मागणी सिसोदियांकडून करण्यात आली होती.

नीट ची परीक्षा २६ जुलैला
नीटची परीक्षा २६ जुलैला आयोजित केली जाईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी यासंबंधीची माहिती दिली. २६ जुलैला देशभरात त्यामुळे देशा​तील विविध परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा आयोजित केली जाईल. यावर्षी १५ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील. कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. यामुळे परीक्षा केंद्राची संख्या दुप्पट केली जाईल, असेही पोखरियाल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. परिक्षेवरील अनिश्चिततेचे सावट त्यामुळे हटले आहे.

विद्यार्थ्यांनी ​तणावमुक्त होवून परीक्षा द्यावी

'नॅशनल टेस्ट अभ्यास' अँपचा उल्लेख करतांना पोखरियाल म्हणाले की, साडे पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हे अँप डाउनलोड केले आहे. या अँप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभ्यास करीत स्वत:चे मूल्यांकन केले आहे. आतापर्यंत साडे सहा लाखांहून अधिक तास विद्यार्थ्यांनी अँपवर तयारी केली आहे. त्यामुळे त्यांनी तनाणमुक्त होवून परीक्षा देण्याचे आवाहन पोखरियाला यांच्याकडून करण्यात आले आहे. जेईई मुख्य परीक्षा १८ ते २३ जुलै दरम्यान होईल. परीक्षा वेगवेगळ्या टप्यात आयोजित केले जाईल. जेईई मुख्य परीक्षा एका दिवसात दोन वेगवेगळ्या टप्यात घेतली जाईल.
Moment finally found!  Schools and colleges will start after this date

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा