शौचालयाचे बिल काढून देण्यासाठी चाळीस हजार स्वीकारताना सरपंच पतीला अटक - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 30, 2020

शौचालयाचे बिल काढून देण्यासाठी चाळीस हजार स्वीकारताना सरपंच पतीला अटक


टीम मंगळवेढा टाईम्स । साडे ता.करमाळा येथे ४० शौचालये बांधली. शासनाकडून ८ शौचालयांचे पैसे मंजूर करून दिले आहेत , उर्वरित ३२ शौचालयाचे पैसे मंजूर करून देतो म्हणून एक लाख रुपयांची मागणी करून ४० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना सरपंच पतीला रंगेहाथ पकडण्याची कारवाई लाचलुचपत विभागाने सोमवारी केली. नवनाथ लक्ष्मण बदर (वय ५७ वर्ष ,रा.साडे ,ता.करमाळा) असे संशयित आरोपीचे नाव असून , करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदीचे काम सुरू होते.


साडे ,ता.करमाळा येथे ४० शौचालयांचे काम केले आहे. सदरचे काम पूर्ण केल्यानंतर पहिल्या आठ शौचालयांचे पैसे मंजूर झाले आहेत. उर्वरित बत्तीस शौचालयांचे पैसेही मंजूर करून देतो म्हणून सरपंच पती नवनाथ बदर यांनी तक्रारदाराकडे २३ जून रोजी एक लाख रुपयांची मागणी केली होती.


त्यातील पहिला हप्ता ४० हजार रुपये सोमवारी देण्याचे ठरवले होते. दरम्यान लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील , पोलिस निरीक्षक कवीता मुसळे, संजय बिराजदार ,पकाले, घाडगे , सनके , श्याम सुरवसे यांच्या पथकाने कारवाई केली.

Sarpanch arrests husband for accepting Rs 40,000 for toilet bill

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment