समाधान आवताडेंनी निभावली ‘माणुसकी’ ; अपघातातील जखमींना केली मदत - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

समाधान आवताडेंनी निभावली ‘माणुसकी’ ; अपघातातील जखमींना केली मदतसमाधान फुगारे । रस्त्यावर झालेल्या अपघातग्रस्तांना मदत करणारा देवदूत समजला जातो मंगळवेढा ते सांगोला रोडवर झालेल्या अपघात जखमींना दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी गाडी थांबवून मदत केली आहे.त्यांनी धावपळीतही माणुसकीचं दर्शन घडवलं आहे.  Satisfaction Avatade fulfilled ‘humanity’;  Helped the injured in the accident

मंगळवार दि.२३ जून रोजी समाधान आवताडे मंगळवेढा ते सांगोला रोडवरुन येत असताना मंगळवेढयापासून जवळच असणाऱ्या लक्ष्मी देवीच्या मंदिराजवळ दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक होवून एक व्यक्ती अत्यवस्थ तर दुसऱ्या व्यक्तीसही मार लागलेल्या अवस्थेत पडलेली समाधान आवताडे यांना दिसली.

अपघाताचं दृश्य पाहून समाधान आवताडे तेथे गाडी थांबविण्यास सांगितली, आणि ते स्वत: गाडीतून उतरून जखमींच्या मदतील धावून गेले. अपघातग्रस्त जखमी रस्त्यावर पडलेले होते.मार लागल्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता. तेव्हा स्वतः समाधान आवताडे यांनी गाडी थांबवून त्यांना मदत केल्याचे उपस्थितांनी सांगितले. अपघातग्रस्तांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर आवताडे रवाना झाले. 

सदर अपघातग्रस्त व्यक्ती ह्या गणेशवाडी येथील होत्या. स्वताची गाडी थांबवून समाधान आवताडे यांनी तात्काळ अॅम्बुलन्सला फोन लावून तातडीने अॅम्बूलन्स बोलावून घेवून सदर जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी हॉस्पीटलला पोहोचविणेस मदत केली.माणूसकीचा धर्म पाळून त्यांनी केलेली ही मदत एखाद्याचा प्राण वाचवू शकते. माणूस कितीही धावपळीत असला तरीही माणूसकीचा धर्म हा मोठा आहे हेच यावरुन दिसून येते.

अपघातग्रस्तांना मदत करा असे शासन आणि प्रशासनाच्या वतीने सातत्याने करण्यात येते. समाधान आवताडे यांनी स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात सामान्य नागरिकांसमोर एक उदाहरण घालून दिले.  Samadhan Avtade helped the injured in the accident

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment