SSC व HSC चा निकाल आणखी लांबणार? 'या' तारखांना लागण्याची शक्यता - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 22, 2020

SSC व HSC चा निकाल आणखी लांबणार? 'या' तारखांना लागण्याची शक्यता


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. आता सगळ्यांना काळजी लागलीय ती शाळा आणि कॉलेजेसची त्याच बरोबर 10 वी आणि 12 वीच्या निकालांची. कोरोनामुळे पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे. याआधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं संकेत दिले होते. यानुसार आता ही तारीख 27 ते 28 जुलै असण्याची शक्यता आहे.  Will SSC and HSC results be further delayed?  Likely to be on these dates

कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरूच आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्ध्यांचे नुकसान होई नये यासाठी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी ई-शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतलांय. आणि ज्या विद्यार्थ्यांना ई-शिक्षण घेण्यास अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि रेडियोच्या माध्यमातूनही शिक्षण देण्यासाठी सुरवात करत असल्याची माहीती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. 12वीची परिक्षा पूर्ण झाली होती. मात्र 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे.

निकालासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा. या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाका. तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता. mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येतील.

No comments:

Post a Comment