सोलापुरात कोरोनाचा वाढता संसर्ग रविवारी 7 बळी ; 76 नव्या रुग्णांची भर - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 29, 2020

सोलापुरात कोरोनाचा वाढता संसर्ग रविवारी 7 बळी ; 76 नव्या रुग्णांची भर


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात रविवारी 76 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृत्यूची संख्या 245 झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत सोलापुरातील मृत्यूदराचे प्रमाण राज्यात अव्वलच आहे. solapur city corona virus update


सोलापुरात आतापर्यंत दोन हजार 217 व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एक हजार 166 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, रविवारी 33 जणांना घरी सोडण्यात आले असून सद्यस्थितीत 806 रुग्णांवर विविध दवाखान्यांमध्ये उपचार सुरु आहेत.

रविवारी पत्रकार भवन, राघवेंद्र नगर, सैफूल, गंगानगर, लक्ष्मी पेठ, स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, रामदेव नगर, शेळगी, साईबाबा चौक, डॉ. आंबेडकर नगर, बुधवार पेठ, अभिषेक नगर, मुरारजी पेठ, भवानी पेठ, पश्‍चिम मंगळवार पेठ, आर्यनंदी नगर, पटर्वधन चाळ, मुरारजी पेठ, सलगर वस्ती, सिध्देश्‍वर नगर, मजरेवाडी, दक्षिण कसबा, लक्ष्मी मार्केट, साखर पेठ, दमाणी नगर, लक्ष्मी पेठ, कुचन हायस्कूल, कविता नगर, उमानगरी, किसान नगर, अक्‍कलकोट रोड, शाहीर वस्ती, भवानी पेठ, कळके वस्ती, सिध्देश्‍वर नगर, भवानी पेठ, घोंगडे वस्ती, दक्षिण कसबा, दत्त चौक, लक्ष्मी नगर, हत्तुरे वस्ती, ओम नम:शिवाय नगर,


कुमठे रोड, हराळे नगर, कुमठे रोड, कुबेर लक्ष्मी विहार, जुळे सोलापूर, प्रतापनगर, विजयपूर रोड, सिध्देश्‍वर नगर, मजरेवाडी, इस्ट हाईट बिल्डींग, सोलापूर, नरसिंह नगर, मोदी, कोर्णाक नगर, विजयपूर रोड, भवानी पेठ, मड्डी वस्ती, कर्णिक नगर, साखर पेठ, राघवेंद्र निलायम, दत्त नगर,दक्षिण सदर बझार, नवीपेठ, न्यू तिऱ्हेगाव, फॉरेस्ट, कमलनगर हैदराबाद रोड, दत्त नगर न्यू पाच्छा पेठ, देशमुख-पाटील वस्ती, श्रध्दानंद तालिमजवळ, भिमाई नगर, विजयपूर रोड, उत्तर सदर बझार, किर्लोस्कर कॉलनी, रिलायन्स ऑफीसमागे, हैदराबाद रोड, वरुण अर्पाटमेंट, होटगी रोड, वीरशैव नगर, विजयपूर रोड, रविवार पेठ, श्राविका हायस्कूलजवळ, बुधवार पेठ,सोमवार पेठ इंद्रधनू, गोकूळधाम आणि जुळे सोलापूर याठिकाणी नवे रुग्ण सापडले आहेत.
सात मृत्यू झालेले व्यक्ती 65 वर्षावरील

सोलापुरातील सात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तींचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला असून सातही रुग्ण 65 वर्षांवरील आहेत. त्यामध्ये  दमाणी नगर, लक्ष्मी पेठेतील 83 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील महापालिका शाळेजवळील 75 वर्षीय पुरुष, पश्‍चिम मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला 

आणि न्यू तिऱ्हेगाव, फॉरेस्ट येथील 77 वर्षीय पुरुष,साई विहार सोसायटी, कुमठा नाका येथील 65 वर्षीय महिला, दर्शना अर्पाटमेंट, श्रध्दानंद तालिमजवळील 65 वर्षीय पुरुष, माऊली कॉम्प्लेक्‍स, सळई मारुती मंदिराजवळील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाला रविवारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तर उर्वरित मृत रुग्णांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment