मंगळवेढा ब्रेकिंग : 'त्या' जावयाच्या संपर्कातील सासुरवाडीतील 10 जणांचे आवाहल प्राप्त - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

मंगळवेढा ब्रेकिंग : 'त्या' जावयाच्या संपर्कातील सासुरवाडीतील 10 जणांचे आवाहल प्राप्त


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे सोलापूरहून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्यानुसंघाने त्याच्या संपर्कातील हुन्नूर येथील 10 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती त्या सर्वांचा अहवाल नेगिटिव्ह आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.  Received appeals from 10 people from Sasurwadi in contact with hunnur


मंगळवेढा तालुक्यात सोलापूरचा एक रहीवासी  हुन्नूर या ठिकाणी दिनांक ९ जून रोजी आला होता. त्यास थकवा, मळमळ आणि अशक्तपणा जाणवू लागले नंतर सोलापूर मधील एका खाजगी रुग्णालयात दि.१२ जून रोजी दाखल झाला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तीना होम क्वारंटाईन केले होते.

मात्र सोलापूर मधील खाजगी रुग्णालयात  घेतलेल्या त्याच्या घशाच्या स्त्रावाचा नमुना कोरोना पॉझिटिव्ह आलेला असल्याची माहीती मिळताच हुन्नूर येथील त्याच्या संपर्कात आलेल्या 10 व्यक्ती (हाय रिस्क कॉंटॅक्ट) ना मंगळवेढा येथे संस्थात्मक विलिनीकरण करून त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

त्याबाबतचा अहवाल आज प्राप्त झाला असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.यानंतर या १० व्यक्तीना यापुढेही १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याबाबत लेखी सूचना देवून सोडण्यात आले.आहे आज रोजी मंगळवेढा तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment