सोलापूरात कडक संचारबंदी करण्याचा प्रस्ताव ; निर्णय आज जाहीर होणार - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

सोलापूरात कडक संचारबंदी करण्याचा प्रस्ताव ; निर्णय आज जाहीर होणार


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहर व परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या व कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणायचा कसा? असाच प्रश्न सर्वसामान्यांसह जिल्हा प्रशासनालाही पडला आहे. 15 दिवसांसाठी सोलापूर शहर व परिसरात कडक संचारबंदी करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तयार केला आहे. Proposal for strict curfew in Solapur;  The decision will be announced today  Guardian Minister of Solapur Dattatraya bharane

या प्रस्तावाबाबत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जे जे प्रयत्न आवश्‍यक आहे ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. पंधरा दिवसाच्या कडक लॉकडाऊन बाबत आज (गुरुवारी) मी सोलापुरात आल्यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल.

दरम्यान, पालकमंत्री भरणे आज (गुरुवारी) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी 11 वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर साडेअकरा वाजता ते सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत. त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गच्या प्रकल्पाबाबतही ते आढावा बैठक घेणार आहेत.

पालकमंत्री भरणे यांच्या आजच्या दौऱ्यात सोलापुरातील लॉकडाऊन बाबत ठोस निर्णय व तारखा जाहीर होण्याची शक्‍यता आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या सोलापुरात दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन पुन: प्रारंभच्या माध्यमातून सवलती दिल्यानंतर अवघ्या 18 ते 20 दिवसांमध्ये सोलापूर शहरातील कोरोना बाधितांची व मृतांची संख्या दुप्पट झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याने हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? याची चाचपणी सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. या उपाययोजनाचा प्रमुख भाग म्हणजे 15 दिवसासाठी कडक लॉकडाऊन हा पर्याय समोर आला आहे. Strict lockdown for 15 days solapur

सोलापूर शहरात करण्यात येणारे संभाव्य लॉकडाऊनबाबत  Collector Milind Shambharkar and Municipal Commissioner P.  Shivshankar is Commissioner of Police Ankush Shinde  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याशी याबाबतची चर्चा करत आहेत.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


No comments:

Post a Comment