महागायक प्रल्हाद शिंदे स्मृतीदिन सामाजिक बांधिलकी जपत पार पडला : डॉ उत्कर्ष शिंदे - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, June 24, 2020

महागायक प्रल्हाद शिंदे स्मृतीदिन सामाजिक बांधिलकी जपत पार पडला : डॉ उत्कर्ष शिंदेसमाधान फुगारे । पोलिस बांधव,शेतकरी,कष्टकरी बांधवांच्या आरोग्यासाठी 16 हजार 000 आरसेनिक अल्बम या गोळ्याचे वाटप व काही गरजूना अन्नधान्य किट वाटप करत Singer Anand Shinde महागायक आनंद शिंदे ह्यांचे सुपुत्र हर्षद आनंद शिंदे व सिने पार्श्वगायक आदर्श आनंद शिंदे व Singer-songwriter Dr. Utkarsh Anand Shinde गायक संगीतकार डॉ.उत्कर्ष आनंद शिंदे व ह्यांनी त्यांचे आजोबा स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांची स्मृती दिन सामाजिक रित्या साजरी केली. Mahagayak Pralhad Shinde Memorial Day Social Commitment Passed: Dr. Utkarsh Shinde

महाराष्ट्रभर १६००० गोळ्याचे वाटप Swarsamrat Pralhad Shinde of Charitable Trust  स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा म. पिंपरी (पुणे ), सोलापूर ,मंगळवेढा ,पंढरपूर मध्ये सामाजिक उपक्रम पिंपरी २२ चल ग सखे पंढरीला म्हणत अवघ्या महाराष्ट्राच्या हदयावर राज्य करणा-या स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे Swarsamrat Pralhadji Shinde यांचा आज १६ वा पुण्यस्मरण दिवस होता.

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे यांना अभिवादन करण्यात आले. कोरोना व्हायरसचे संकट असतांना गेल्या ३ महिन्यापासुन नागरीकांच्या आरोग्यासाठी लढणा-या सर्व पोलीस कर्मचारी , डाॅक्टरांना सलाम करून नागरीकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणा-या या देवदुतरूपी पोलीसांच्या  आरोग्याची काळजी घेणे सुद्धा महत्वाचे असल्याने स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठीच्या लढाईत शहरातील पोलिस बांधव मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहे.

आज पिंपरी चिंचवड पोलिस दलातील अनेक कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे ही खुपच दुखःत गोष्ट आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पोलिस बांधवांना आरसेनिक अल्बम या प्रतिकार शक्ती वाढवणा-या गोळ्याचे वाटप करण्यात आले. तसेच महाराष्ट्रतील मंगळवेढा, सोलापूर या भागातील शेतकरी कष्टकरी कामगार बांधव यांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांना ही प्रल्हाद शिंदे चे नातू हर्षद आनंद शिंदे ह्यांच्या हस्ते आरसेनिक अल्बम या प्रतिकार शक्ती वाढवणा-या गोळ्याचे वाटप करण्यात आले.

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून महाराष्ट्रभर स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने १६००० गोळ्याचे व काही गरजूना आन धान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चे सभासद व शिंदेशाही वर प्रेम करणारे सहकारी बांधव यांनी सहभाग घेतला.

----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment