वाकीचे पोलीस पाटील हालीमसो पाटील यांना कोविड परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल गौरविण्यात आले - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, June 24, 2020

वाकीचे पोलीस पाटील हालीमसो पाटील यांना कोविड परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल गौरविण्यात आले


बाळासाहेब झिंजूरटे । सांगोला तालुक्यातील वाकी (घेरडी) गावचे पोलीस पाटील हालीमसो वजीर पाटील यांना कोविड 19 आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. Police Patil Halimso Patil was honored for his work in Kovid situation

वाघोली पुणे येथील माहिती सेवा समिती व  महा अधिकार संरक्षण समिती या सामाजिक संस्थेने पोलीस पाटील हालीमसो वजीर पाटील यांनी कोरोनाच्या काळात गावातील व परिसरातील अनेक गोर गरीब गरजूंना मदत केली आहे.त्याच्या कामाची कार्याची दखल या सामाजिक संस्थेने घेतली आहे.


राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशजी मंचुरेल आणि पश्चिम महाराष्ट्र कोअर टीमच्या वतीने त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक व आभार पुढील कार्यास अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील लोकशाही सुराज्याची सेवा केल्याबद्दल हे सन्मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment