पॅन-आधार जोडणीला पुन्हा मुदतवाढ - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

पॅन-आधार जोडणीला पुन्हा मुदतवाढ


तात्यासो कोंडूभैरी । पॅन व आधार क्रमांक जोडणीस केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. पॅन - आधार जोडणी आता ३१ मार्च २०२१ पर्यंत करता येईल. त्याशिवाय आयकर विभागाने २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कर विवरण सादर करण्यास ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत वाढवली आहे.  Pan-base connection re-extended

ज्या करदात्यांनी २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र सादर केलेले नाही , अशा करदात्यांना ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.

मात्र मुदतवाढ दिल्याने करदाते २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र आता ३१ जुलै २०२० पर्यंत सादर करू शकतात.

No comments:

Post a Comment