भारतात विश्वचषकासाठी पाकिस्तानला हवे आश्वासन - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

भारतात विश्वचषकासाठी पाकिस्तानला हवे आश्वासन


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणावाच्या राजकीय संबंधांचा फटका आतापर्यंत क्रीडा स्पर्धांना बसला आहे. आयसीसीच्या स्पर्धांचा अपवाद वगळता भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांशी क्रिकेट मालिका खेळत नाहीत. Pakistan needs assurance for World Cup in India

याव्यतिरिक्त अन्य महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना भारताचा व्हिसा मिळवण्यासाठी याआधी अनेकदा त्रास सहन करावा लागला आहे.सध्या कोरोनामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा बंद असल्या तरीही , पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने  Pakistan Cricket Board  याआधीच्या अनुभवांमधून शहाणे व्हायचे ठर २०२१ टी -२० विश्वचषक आणि २०२३ वन - डे विश्वचषक या दोन महत्त्वाच्या स्पर्धांची यजमानपदे भारताला मिळाली आहेत.

या स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सहभागी होण्यासाठी कोणताही व्हिसा प्रॉब्लेम येणार नाही , असे लिखीत आश्वासन देण्याची मागणी पाक क्रिकेट बोर्डाने केली आहे.

२०२१ आणि २०२३ मध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या स्पर्धांचे यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी संघाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी आम्हाला लिखीत आश्वासन हवे आहे.  BCCI  बीसीसीआयने आम्हाला हमी द्यावी,अशी मागणी आम्ही Even to the ICC आयसीसीकडेही करणार आहोत.

विश्वचषक  World Cup  खेळण्यासाठी येणाऱ्या पाकिस्तानी संघाला व्हिसा  Visa to Pakistani team। क्लिअर झालाच पाहिजे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ  Wasim Khan  वासिम खान यांनी एका यू - ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पीसीबीची बाजू मांडली . २०२० सालात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी -२० विश्वचषकाचे आयोजन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे . त्यामुळे २०२१ च्या विश्वचषकाचे यजमानपद कोणाकडे द्यायचे याबद्दल आयसीसीने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.

पाकिस्तानीकडून भारतावर होणारे दहशतवादी हल्ले याचे कारण देत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी काही आजी - माजी पाकिस्तानी खेळाडूंनी भारत - पाक क्रिकेट मालिका खेळवण्याची मागणीही केली होती. India-Pakistan Cricket Series

No comments:

Post a Comment