दामाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ८ जून, २०२०

दामाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू


समाधान फुगारे । मंगळवेढा येथील दामाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व  महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना या शासनाच्या योजनेचा शुभारंभ नुकताच तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे,माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार आदी होते.


मंगळवेढा येथे दामाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये शासनाने पिवळया,केशरी व पांढर्‍या रेशन कार्डधारकांच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी ज्या हॉस्पीटलला शासनाकडून नूकतीच मान्यता मिळाली आहे.या योजनेत जवळपास 1 हजार 209 आजारावर मोफत उपचार होणार आहेत. रुग्णांनी येताना रेशन कार्ड व आधार कार्ड आणणे गरजेचे आहे. रुग्णांच्या घरी जाईपर्यंतचा खर्च शासन करणार आहे.

जिल्हयामध्ये 34 हॉस्पीटलमध्ये ही योजना कार्यान्वित आहे. मंगळवेढयात ही पहिल्यांदा योजना चालू झाली असून रुग्णांची या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.संदेश पडवळ यांनी प्रास्ताविकात केलेे.

तहसीलदार रावडे म्हणाले,शासनाची ही योजना सर्व स्तरातील नागरिकांसाठी मोफत आहे.मंगळवेढयात ही योजना सुरु झाल्याने रुग्णांना प्रवासासाठी करावा लागणार्‍या खर्चाची बचत होणार असून उपचारासाठीचा खर्च शासन करणार असल्याचे ते म्हणाले.


प्रमुख पाहुण्या  मुख्याधिकारी पल्लवी पाटील म्हणाल्या,शहरामध्ये प्रथमच शासनाची आरोग्यविषयक योजना सुरु होत आहे. यापुर्वी रुग्णांना उपचारासाठी जिल्हयाच्या ठिकाणी जावे लागत होते. स्थानिक स्तरावर ही योजना चालू झाल्याने  लोकांच्या वेळेची बचत होणार असल्याच्या त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाला आरोग्य पर्यवेक्षक नागेश बनसोडे,सोमनाथ बुरजे,सुधाकर पडवळ,डॉ.किरण पडवळ यांच्यासह हॉस्पीटलमधील कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार हणमंत मासाळ यांनी केले.

damaji Multispeciality Hospital mangalwedha launched Pradhan Mantri and Mahatma Phule Janaarogya Yojana

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा