कर्ज काढलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण ; पाच जणांविरूध्द गुन्हा - Mangalwedha Times

Breaking

Monday, June 22, 2020

कर्ज काढलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण ; पाच जणांविरूध्द गुन्हा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । घरावर लोन काढून दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून आण्णासो माने यांना काठीने मारहाण केल्याप्रकरणी बाळासाहेब नामदेव काळुंगे,राजू  उर्फ मुन्ना नामदेव काळुंगे,संकेत बाळासाहेब काळुंगे,संकल्प बाळासाहेब काळुंगे,मंगल गोरख गवळी (सर्व रा. कचरेवाडी) या पाच जणांविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. One beaten to death for asking for loan money;  Crime against five people

या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी आण्णाो माने (वय 37) हे दि. 19 रोजी सकाळी 8.00 वा. घरासमोर बसले असता फिर्यादीने घरावर लोन काढून दिलेले पैसे आरोपी तथा मामा बाळासाहेब नामदेव काळुंगे यांना मागितले असता वरील सर्व आरोपीनी संगनमत करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून  काठीने बेदम मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

तुला पैसे देत नाही काय करायचे ते कर असे म्हणून फिर्यादीस दमदाटी केली. याचा अधिक तपास पोलिस नाईक पाटील हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment